Oppo Find N3 Flip लवकरच होणार लाँच, पहिल्यांदाच फ्लिप फोनमध्ये मिळतील ‘हे’ Best फीचर्स | Tech News

Updated on 11-Oct-2023
HIGHLIGHTS

12 ऑक्टोबरला Oppo Find N3 Flip भारतात लाँच होणार

Oppo Find N3 Flip फ्लिप फोन कॅटेगरीमध्ये गेम चेंजर ठरेल.

फ्लिप फोनमध्ये पहिल्यांदाच अलर्ट स्लाइडर देण्यात येणार आहे.

Oppo चा नवीन फ्लिप फोन भारतीय बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, 12 ऑक्टोबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. Oppo Find N3 Flip फ्लिप फोन कॅटेगरीमध्ये गेम चेंजर ठरेल, अशी चर्चा देखील टेक विश्वात सुरु आहे. हा पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल, असे देखील म्हटले जात आहे. आगामी फोनची स्पर्धा थेट Samsung Galaxy N3 Flip शी होईल, असे मानले जात आहे. आगामी स्मार्टफोन Oppo Find N3 Flip चे डिझाईन आणि कॅमेरा डिटेल्स लाँच होण्यापूर्वीच लीक झाले आहेत. पहिल्यांदाच फ्लिप फोनमध्ये काही फीचर्स मिळणार आहेत. बघा सविस्तर-

हे सुद्धा वाचा: OnePlus Open ची इंडिया लाँच अखेर कन्फर्म, पोस्टरमध्ये बघा Attractive डिझाईनची पहिली झलक

अलर्ट स्लाईडर

या फोनसह फ्लिप फोनमध्ये पहिल्यांदाच अलर्ट स्लाइडर देण्यात येणार आहे. यासह, वापरकर्ते विविध अलर्ट मोड कस्टमाइझ करण्यास सक्षम असतील. फोनची कव्हर स्क्रीन 3.26 इंच असेल, ही 40 ऍपला सपोर्ट करेल. कव्हर स्क्रीनमध्ये Gmail, उबर, गुगल मॅप आणि यूट्यूबचा वापर करता येईल. तसेच, वापरकर्ते Email ला देखील रिप्लाय देऊ शकतील. या व्यतिरिक्त, तुम्ही यासह म्युझिक देखील कन्ट्रोल करू शकता.

oppo find n3 flip 5g

कॅमेरा

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला हा उद्योगातील पहिला फ्लिप फोन असेल. ज्यामध्ये, 50MP प्रायमरी कॅमेरा असेल. त्याबरोबरच, 32MP टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि 48MP वाइड अँगल कॅमेरा दिला जाईल. फोनच्या समोर 32MP पंच होल कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस गोरिला ग्लास विक्टस कव्हर बॅक दिले जाऊ शकते. त्याचा मुख्य डिस्प्ले 6.8 इंच असेल. यामध्ये एअरक्राफ्ट ग्रेड हाय स्ट्रेंथ स्टीलचा वापर करण्यात आला असून त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढेल. म्हणजे फोन पडला तर लवकर तुटणार नाही. यात डायमंड हायलाइट ब्लेड डिझाइन आहे. त्याबरोबरच, फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन MediaTek Dimensity 9200 चिपसेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम मिळण्याची शक्यता आहे. फोन 4300mAh च्या मोठ्या बॅटरीसह येईल, जो 44W फास्ट चार्जरच्या सपोर्ट असेल.

लक्षात घ्या की, वरील सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झालेल्या अहवालानुसार सांगण्यात आले आहेत. फोनचे कन्फर्म फीचर्स लाँच झाल्यावरच माहित होतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :