Oppo ने एक नवीन टीजर शेयर करत आपला नवीन स्मार्टफोन म्हणजे Oppo F9 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. ही माहिती कंपनी च्या मलेशिया च्या ट्विटर पेज वरून समोर आली आहे. हा डिवाइस एका प्रो वेरिएंट सह लॉन्च केला जाऊ शकतो. या आधी या डिवाइस बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही, पण आता कंपनी ने याबद्दल माहिती शेअर केली आहे.
अधिकृत टीजर मध्ये Oppo F9 Pro स्मार्टफोन ला एका ट्रायंगल शेप वाल्या नॉच सोबत दिसला आहे. तसेच त्यात असे पण दिसत आहे की हा डिवाइस VOOC चार्जिंग ला सपोर्ट करणार आहे. या टीजर मधून असे पण समोर येत आहे की फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंग नंतर हा डिवाइस जवळपास 2 तास वापरता येईल. त्याचबरोबर या डिवाइस मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप असल्याचे समजत आहे.
Oppo बद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी कंपनीने Oppo F7 सादर केला होता. Oppo F7 पाहता हा डिवाइस वेगवेगळ्या दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचा बेस वेरिएंट कंपनी ने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. तसेच याचा हाई-एंड वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च करण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोंस ची किंमत क्रमश: Rs 19,990 आणि Rs 23,990 आहे. हे दोन्ही वेरिएंट्स को सोलर रेड आणि मूनलाइट सिल्वर रंगांमध्ये विकत घेता येतील, हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट तसेच अमेजॉन इंडिया वरून घेऊ शकता.
Oppo F7 एका गोष्टी मुळे खास आहे आणि तो आहे याचा 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा, पण या स्मार्टफोन ची खासियत फक्त हीच नाही, यात AI क्षमाता देण्यात आली आहे. यात 16MP चा रियर कॅमेरा आहे जो f/1.8 सह येतो जो नव्या कॅमेरा अॅल्गोरिथम सह पेयर्ड आहे आणि वेगवेगळे सीन्स ओळखतो आणि त्यानुसार सेटिंग्स बदलू पण शकतो.