Oppo ने आपला F9 स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मध्ये एक वेगळा V आकाराचा नॉच देण्यात आला आहे ज्यामुळे याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.8 टक्के झाला आहे. कंपनी चे नियोजन पाहता बोलले जात आहे की Oppo F9 एक सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल ज्याच्या फ्रंटला 25 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत आणि उपलब्धता
वियतनाम मध्ये Oppo F9 ची किंमत VND 7,690,000 (जवळपास 23,300 रूपये) आहे. कंपनी ने संकेत दिले आहेत की डिवाइस 21 ऑगस्टला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.
Oppo F9 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo F9 Helio P60 SoC आणि ARM माली-G72 GPU वर चालतो. तसेच डिवाइस 4GB/6GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे, डिवाइस मध्ये 6.3 इंचाची LTPS TFT स्क्रीन देण्यात आली आहे जिचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. स्मार्टफोन च्या टॉपला एक छोटा नॉच आहे ज्यात फ्रंट कॅमेरा ठेवण्यात आला आहे.
ऑप्टिक्स पाहता डिवाइस च्या बॅक वर डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, यात एक 16 मेगापिक्सल चा प्राइमरी सेंसर आणि एक 2 मेगापिक्सल चा सेकेंडरी सेंसर आहे जो डेप्थ साठी वापरला जातो. दोन्ही कॅमेरांचा अपर्चर क्रमश: f/1.8 आणि f/2.4 आहे आणि हा बोकेह स्टाइल फोटो क्लिक करू शकतो. Oppo F9 च्या फ्रंटला 25 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे जो f/2.0 अपर्चर सह येतो.
कनेक्टिविटी साठी Oppo F9 मध्ये Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, डुअल SIM, 4G VoLTE, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी Oppo च्या VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी सपोर्ट सोबत येते आणि कंपनी चा दावा आहे की 5 मिनिटांच्या चार्जिंग मध्ये ही 2 तासांचा टॉकटाइम देते. हा एंड्राइड 8.1 ओरियो सह ColorOS 5.2 वर चालतो.