Oppo F7 स्मार्टफोन ची किंमत झाली Rs 3000 ने कमी, आता किंमत आहे फक्त…

Updated on 10-Jul-2018
HIGHLIGHTS

Oppo F7 स्मार्टफोन 25-मेगापिक्सल च्या AI सेल्फी कॅमेरा सह येतो.

Oppo F7 Slashed by 3000 in India Flipkart and Amazon India: Oppo F7 स्मार्टफोन या वर्षी मार्च महिन्यात लॉन्च करण्यात आला होता, तेव्हा या स्मार्टफोन ची किंमत Rs 22,990 होती. या स्मार्टफोन च्या सर्वात जास्त चांगल्या आणि आकर्षक फीचर बद्दल बोलायचे तर यात की 25-मेगापिक्सल चा AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा डिवाइस खासकरून युवकांना टारगेट करून बनवण्यात आले आहे. आता डिवाइस ची किंमत जवळपास Rs 3,000 ने कमी करण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अजूनच अफोर्डेबल झाला आहे. 

हा डिवाइस वेगवेगळ्या दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचा बेस वेरिएंट कंपनी ने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. तसेच याचा हाई-एंड वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट सह लॉन्च करण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोंस ची किंमत क्रमश: Rs 19,990 आणि Rs 23,990 आहे. हे दोन्ही वेरिएंट्स को सोलर रेड आणि मूनलाइट सिल्वर रंगांमध्ये विकत घेता येतील, हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट तसेच अमेजॉन इंडिया वरून घेऊ शकता. 

Oppo F7 एका गोष्टी मुळे खास आहे आणि तो आहे याचा 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा, पण या स्मार्टफोन ची खासियत फक्त हीच नाही, यात AI क्षमाता देण्यात आली आहे. यात 16MP चा रियर कॅमेरा आहे जो f/1.8 सह येतो जो नव्या कॅमेरा अॅल्गोरिथम सह पेयर्ड आहे आणि वेगवेगळे सीन्स ओळखतो आणि त्यानुसार सेटिंग्स बदलू पण शकतो. 

Oppo F7 एंड्राइड 8.1 पर आधारित कंपनी च्या ColorOS 5.0 UI वर चालतो आणि यात मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर आहे. कंपनी चा दावा आहे की Oppo F7 Oppo F5 च्या तुलनेने 20% फास्ट आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये 3400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी नुसार ही बॅटरी 8.3 तासांचा गेमिंग आणि 13.4 तासांचा वीडियो प्लेबॅक ऑफर करते.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :