Oppo F7 Diamond Black Edition Sale: लवकरच सेल साठी येणार आहे Oppo चा हा दमदार एडिशन

Updated on 17-Apr-2018
HIGHLIGHTS

Oppo F7 Diamond Black Edition स्टॅण्डर्ड वेरिएंट च्या तुलनेत जास्त स्टोरेज सह येईल, पण याची खासियत याची डिजाईन असेल.

Oppo ने आपल्या Oppo F7 Diamond Black Edition ची भारतातील उपलब्धते बद्दल माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन एका इवेंट मध्ये 26 मार्चला सादर करण्यात आला होता. पण हा फक्त सोलर रेड आणि मूनलाइट सिल्वर रंगतच उपलब्ध होता. पण आता कंपनी हा डिवाइस तिसरा कलर वेरिएंट घेऊन येत आहे. 

Oppo F7 Diamond Black Edition भारतात 21 एप्रिलला सेल साठी येणार आहे. हा फ्लिपकार्ट, अमेजॉन इंडिया आणि Paytm च्या माध्यमातून विक्री साठी उपलब्ध होईल. जसे की इतर सर्व F7 मॉडेल आपण बघितले होते, तसेच या डिवाइस मध्ये पण तेच स्पेक्स आणि फीचर असतिल. पण याची डिजाईन थोडी हटके असेल. तसेच याची स्टोरेज पण जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. 
या डिवाइस मध्ये 6GB रॅम सह 128GB स्टोरेज असेल. तसेच जसे की आपल्याला माहीत आहे की Oppo F7 स्मार्टफोन ची किंमत जवळपास Rs 21,990 पासून सुरू होते, या डिवाइस च्या बाबतीत असे सांगण्यात येत आहे की हा Rs 26,990 मध्ये उपलब्ध केला जाईल. 
Oppo F7 स्मार्टफोन च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर Oppo F7 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत Rs 21,990 आहे. तर याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट Rs 26,990 च्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. 
फोन ची सर्वात मोठी खासियत 25MP चा सेल्फी कॅमेरा आहे आणि कंपनी आपला हा डिवाइस “सेल्फी एक्सपर्ट”असल्याचा दावा करत आहे. आधीच्या Oppo F5 प्रमाणे हा फोन पण “AI एनहांस्ड सेल्फी” शूट करेल. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम प्रमाणे याचा कॅमेरा AR स्टीकर्स पण देतो. 
स्मार्टफोन च्या काही स्पेक्स पाहता यात 16MP चा रियर कॅमेरा आहे जो f/1.8 सह येतो जो नव्या कॅमेरा अॅल्गोरिथम सह पेयर्ड आहे आणि वेगवेगळे सीन्स ओळखतो आणि त्यानुसार सेटिंग्स बदलू पण शकतो. कॅमेरा 16 वेगवेगळे सीन्स ओळखतो जसे की फूड, पोर्ट्रेट, पेट्स इत्यादि. 
डिवाइस मध्ये 6.23 इंचाचा डिस्प्ले आहे जो फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे आणि याचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. डिवाइस च्या टॉप वर एक notch आहे आणि याच्या बॅक वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सोबतच मागच्या वेळे प्रमाणे यावेळेस पण डिवाइस ला ग्लॉसी बॅक देण्यात आली आहे. 

डिवाइस एंड्राइड 8.1 पर आधारित कंपनी च्या ColorOS 5.0 UI वर चालतो आणि यात मीडियाटेक हेलिओ P60 प्रोसेसर आहे. कंपनी चा दावा आहे की Oppo F7 Oppo F5 च्या तुलनेने 20% फास्ट आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये 3400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी नुसार ही बॅटरी 8.3 तासांचा गेमिंग आणि 13.4 तासांचा वीडियो प्लेबॅक ऑफर करते. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :