प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अखेर Oppo F29 सिरीज आज भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोन्सबद्दल माहिती ऑनलाईन फिरत आहे. अखेर ही सिरीज भारत लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने Oppo F29 5G आणि Oppo F29 Pro 5G हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. हे फोन शक्तिशाली प्रोसेसर तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीने सुसज्ज आहेत. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेक्स-
Also Read: Google Pixel 9a Launched: मोठा डिस्प्ले, अपग्रेडेड कॅमेरासह नवा फोन भारतात लाँच, जास्त नाहीये किंमत?
Oppo F29 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. फोनचा टॉप व्हेरिएं 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 25,999 रुपये आहे. सॉलिड पर्पल आणि ग्लेशियर ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Oppo F29 Pro 5G ची 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. अखेर फोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा फोन मार्बल व्हाइट आणि ग्रॅनाइट ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
तर Oppo F29 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2412x 1080 आहे. तर, दुसरीकडे प्रो बद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या Oppo F29 फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. तर, सिरीजच्या प्रो फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर दिला जाईल.
Oppo F29 5G हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य सॅमसंग S5KJNS सेन्सर आणि 2MP चा दुसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा मुख्य आणि 2MP चा दुसरा सेन्सर आहे.
Oppo F29 5G हँडसेटमध्ये 6500mAh बॅटरी आहे. हे 45W सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते. Oppo F29 Pro फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीसह हा फोन दीर्घकाळापर्यंत टिकेल.