OPPO F29 5G Launched in India
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अलीकडेच Oppo F29 5G भारतात लाँच केला आहे. दरम्यान, लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून भारतात सुरु होणार आहे. लक्षात घ्या की, Oppo F29 Series 5G अंतर्गत कंपनीने Oppo F29 5G आणि Oppo F29 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. पहिल्या सेलमध्ये सवलतीसह स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे. तसेच, निवडक बँक कार्डवर सवलत उपलब्ध असेल. त्याबरोबरच, आणखी अनेक फायदे दिले जातील. जाणून घेऊयात Oppo F29 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: iQOO Z10 5G च्या नव्या टिझरमध्ये दिसतेय फोनची पहिली झलक! आणखी काय मिळेल विशेष?
Oppo F29 5G ची पहिली सेल आज 27 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. Oppo F29 5G हा फोन सॉलिड पर्पल आणि ग्लेशियर ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC, Axis आणि SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट मिळेल. त्याबरोबरच, या फोनवर 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart आणि Oppo India च्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टफोन खरेदी करता येतील.
Oppo F29 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षिततेसाठी फोनला IP66/IP68/IP69 रेटिंग देण्यात आले आहे. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसर उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6500mAh बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी, या हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा मुख्य सॅमसंग S5KJNS सेन्सर आणि 2MP चा दुसरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.