लेटेस्ट Oppo F27 Pro+ 5G भारतीय बाजारात लाँच! पाण्यातही वापरता येईल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

लेटेस्ट Oppo F27 Pro+ 5G भारतीय बाजारात लाँच! पाण्यातही वापरता येईल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

Oppo F27 Pro+ 5G फोनचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.

Oppo F27 Pro+ 5G ची विशेषता म्हणजे या फोनची डॅमेज प्रूफ बॉडी होय.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo च्या नव्या Oppo F27 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. अखेर आता Oppo F27 Pro+ 5G भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा F-सिरीजचा नवीन स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा फोन फ्लॅगशिप कॉसमॉस रिंग डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. या फोनला मजबूत बॉडी आणि IP69 रेटिंग मिळाली आहे. म्हणजे पाण्यात पडल्यावरही सहज चालेल, असा सव करण्यात आला आहे.

Also Read: भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 Pro 5G ची पहिली Sale सुरू, 15000 रुपयांचा Discount

Oppo F27 Pro+ 5G ची किंमत

Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, फोनचा 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनचे प्री-बुकिंग आजपासून म्हणजेच 13 जून 2024 पासून सुरू झाले आहे. फोनची विक्री 20 जून 2024 पासून सुरू होईल.

Oppo F27 Pro+ 5G

Oppo F27 Pro Plus फोन मिडनाईट नेव्ही आणि डस्क पिंक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Flipkart आणि Amazon India वरून खरेदी करता येईल.

Oppo F27 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo F27 Pro+ 5G ची विशेषता म्हणजे या फोनची डॅमेज प्रूफ बॉडी होय. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हाय परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे देखील वाढवता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, ड्युअल सिम स्लॉट, ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रिल, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.

Oppo F27 Pro Plus
Oppo F27 Pro Plus

फोटोग्राफीसाठी, या Oppo F27 Pro Plus मध्ये LED फ्लॅश लाईटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये OIS सपोर्टसह 64MP लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo