प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo च्या आगामी फोनची चर्चा सुरु होती. अखेर आता कंपनीने OPPO F27 Pro+ 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची अखेर पुष्टी करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. फोनची समर्पित मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर सूचीबद्ध केली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात OPPO F27 Pro+ 5G ची भारतीय लाँच डेट-
Also Read: भारतातील सर्वात स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 3 Pro 5G लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News
OPPO कंपनीने OPPO F27 Pro+ 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. कंपनीने Oppo India च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत ने OPPO F27 Pro+ 5G बद्दल माहिती दिली आहे. Oppo चा हा फोन भारतात 13 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल.
याशिवाय, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. आम्ही सांगितल्याप्रमाणे, फोनची समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. ज्याद्वारे आगामी स्मार्टफोनबाबत काही महत्त्वाचे तपशील देखील उघड झाले आहेत. हा फोन मिडनाईट नेव्ही आणि डस्क पिंक या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.
OPPO F27 Pro+ 5G फोनच्या समर्पित मायक्रोसाइटद्वारे फोनचा अधिकृत लूक समोर आला आहे. फोनच्या मागील बाजूस लेदर बॅक पॅनल दिला जाईल. त्याबरोबरच, कॅमेरा मॉड्यूलसाठी फोनमध्ये कॉसमॉस रिंग डिझाइन देखील दिसत आहे. यासह Oppo चा हा फोन केस-फ्री असू शकतो, अशी अपेक्षा केली जात आहे. म्हणजेच ग्राहक हा फोन कव्हरशिवाय वापरू शकतात.
आगामी स्मार्टफोन IP69, IP68 आणि IP66 रेटिंगसह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल, असे Flipkart लिस्टिंगदारे पुढे आले आहे. या स्मार्टफोनमध्ये लष्करी दर्जाची टिकाऊपणा आणि MIL-STD-810H रेटिंग असेल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 दिला जाईल. याव्यतिरिक्त, येत्या काही दिवसांत फोनचे इतर फिचर्स समोर येतील अशी अपेक्षा केली जाऊ शकते.