64MP कॅमेरासारख्या Powerful फीचर्ससह OPPO F25 Pro 5G लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

64MP कॅमेरासारख्या Powerful फीचर्ससह OPPO F25 Pro 5G लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

ब्रँडने भारतीय वापरकर्त्यांसाठी OPPO F25 Pro 5G लाँच केला आहे.

OPPO F25 Pro 5G ची सुरुवातीची किंमत 23,999 रुपये इतकी आहे.

सध्या नवीन फोन भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Oppo ने आज आपल्या F-सिरीजचा विस्तार केला आहे. या सिरीजअंतर्गत ब्रँडने भारतीय वापरकर्त्यांसाठी OPPO F25 Pro 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. त्याबरोबरच, या फोनसह काही ऑफर्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फोनच्या विशेष स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, IP65 रेटिंग सारखे अनेक अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा: WhatsApp: नवीन ‘Search by date’ फिचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट, तारखेवरून ‘अशा’प्रकारे शोधा Important मॅसेजेस। Tech News

OPPO F25 Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स

OPPO F25 Pro 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात लाँच केला आहे. फोनच्या 8GB RAM + 128 GB स्टोरेज मॉडेलची लाँच किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, डिवाइसच्या 8GB RAM + 256G वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. सध्या हे दोन्ही फोन भारतात प्री-ऑर्डरसाठी Flipkart, Amazon आणि OPPO स्टोअर्सद्वारे उपलब्ध आहे. तर, फोनची खुली विक्री 5 मार्चपासून सुरू होणार आहे.

Oppo F25 Pro 5G launched in India
Oppo F25 Pro 5G launched in India

कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन लावा रेड अवर आणि ओशन ब्लू अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. लॉन्चिंग ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, SBI आणि ICICI बँक कार्डद्वारे व्यवहार केल्यास या फोनवर 2,000 रुपयांची झटपट सूट दिली जाईल.

OPPO F25 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F25 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट दिला आहे. हा चिपसेट तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स देतो. या फोनमध्ये विस्तारित 8GB रॅम आणि स्टोरेज विस्तृत करण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील मिळेल. ज्याच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल.

Oppo F25 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप कॅमेरा आहे. ज्यामध्ये 64MP OV64B प्रायमरी, 8MP Sony IMX355 अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी हा फोन 32MP कॅमेराने सज्ज असेल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo