OPPO F23 5G नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत ?

Updated on 16-May-2023
HIGHLIGHTS

OPPO F23 5G स्मार्टफोन भारतात लाँच

फोनचे प्री-बुकिंग आज म्हणजेच 15 मे दुपारी 12 वाजतापासून सुरू

फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

OPPO F23 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP बॅक आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेक्स – 

OPPO F23 5G ची भारतीय किंमत

कंपनीने OPPO F23 5G स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये निश्चित केली आहे. हा फोन बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. फोनचे प्री-बुकिंग आज म्हणजेच 15 मे दुपारी 12 वाजतापासून सुरू झाली आहे. 

OPPO F23 5G

या फोनमध्ये 6.72-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz चा आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबत फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट असेल. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

फोनमधील बॅटरी 5,000mAh ची आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, GPS, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट असेल. तसेच, यात 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :