Oppo F21s Pro Series : सेगमेंटचा पहिला 30x झूम फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Oppo F21s Pro Series : सेगमेंटचा पहिला 30x झूम फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Oppo F21s Pro Series चे स्मार्टफोन्स भारतात लाँच

कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 25,999 रुपये

फोन 19 सप्टेंबरपासून Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध होणार

स्मार्टफोन ब्रँड Oppo ने भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Oppo F21s Pro सीरीज लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत Oppo F21s Pro आणि Oppo F21s Pro 5G फोन सादर करण्यात आले आहेत. या फोनमध्ये मॅक्रो लेन्ससह 15x आणि 30x झूम सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की या सेगमेंटमधील हा पहिला फोन आहे, जो या फीचरसह येतो. 

हे सुद्धा वाचा : Security Tips : सोशल मीडियासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे खूप महत्वाचे, 'या'प्रमाणे करा ऍक्टिव्ह

Oppo F21s Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F21s Pro 5G मध्ये 6.43-इंच फुल HD + AMOLED डिस्प्लेसाठी सपोर्ट आहे. जो 1,080×2,400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि SCHOTT Xensation ग्लास कव्हरसह येतो. फोनमध्ये Android 12 आधारित ColorOS 12.1 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आणि 8 GB LPDDR4X रॅमसह 128 GB स्टोरेजसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.

Oppo F21s Pro 5G सह ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंग सह देखील सपोर्ट आहे. 

oppo f21s pro series

Oppo F21s Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F21s Pro देखील 5G ​​व्हेरिएंटप्रमाणेच फीचर्ससह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6.43-इंच फुल HD + AMOLED डिस्प्लेसाठी समर्थन आहे, जे 1,080×2,400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि SCHOTT Xensation ग्लास कव्हरसह येते. फोनमध्ये Android 12 आधारित ColorOS 12.1 सपोर्ट देण्यात आला आहे.

Oppo F21s Pro मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर आणि 8 GB LPDDR4X RAM सह 128 GB स्टोरेज आहे. Oppo F21s Pro ला देखील 5G ​​सारखाच रियर कॅमेरा सेटअप मिळतो. मात्र, या फोनसोबत 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे.

Oppo F21s Pro सिरीजची किंमत

 Oppo F21s Pro 5G च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 25,999 रुपये आणि Oppo F21s Pro 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 19 सप्टेंबरपासून Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. दोन्ही फोन सध्या प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. Oppo F21s Pro आणि Oppo F21s Pro 5G फोन डाउनलाइट गोल्ड आणि स्टारलाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo