बेस्ट डिल ! फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करा Oppo F21 Pro, मूळ किंमत आहे खूप जास्त

बेस्ट डिल ! फक्त 18,999 रुपयांमध्ये खरेदी करा Oppo F21 Pro, मूळ किंमत आहे खूप जास्त
HIGHLIGHTS

OPPO F21 Pro वर मिळतेय तब्बल 7 हजार रुपयांची थेट सूट

याशिवाय, अनेक बँक ऑफर्सही यावर मिळत आहेत.

ही आकर्षक डिल फ्लिपकार्टवर उपलब्ध

OPPO F21 Pro गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लाँच झाला होता. आता या फोनवर तुम्हाला एक उत्तम ऑफर मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, OPPO F21 Pro स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल जवळपास 27,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आले होते, परंतु आता Flipkart या फोनवर सुमारे 25 टक्के सूट देत आहे. बघुयात सविस्तर… 

हे सुद्धा वाचा : क्रिकेट लव्हर्स ! अगदी मोफतमध्ये कसे बघता येईल IPL, येथे वाचा…

किंमत आणि ऑफर्स : 

Flipkart तुम्हाला Oppo F21 Pro स्मार्टफोनवर सुमारे 25 टक्के म्हणजेच सुमारे 7000 रुपयांची सूट देत आहे, ती त्वरित सूट म्हणून दिली जात आहे. आता तुम्ही या इन्स्टंट डिस्काउंटचा फायदा घेतल्यास फोनची किंमत 27,999 रुपयांवरून 20,999 रुपयांपर्यंत कमी होते. याशिवाय बँक ऑफर म्हणून तुम्हाला फोनवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. 

जर तुमच्याकडे PNB क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला 10% म्हणजे सुमारे रु. 1000 ची सूट मिळू शकते. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय, तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व्यवहारावर 2000 रुपयांची ऑफर मिळेल.

 जर तुम्ही SBI बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे, ज्यानंतर तुम्ही हा फोन अगदी कमी किंमतीत तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

OPPO F21 Pro स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 640 प्रोसेसर मिळत आहे, याशिवाय तुम्हाला या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. या फोनमध्ये तुम्हाला Android 12 वर आधारित ColorOS 12.1 चा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये तुम्हाला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेट तसेच गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह सुसज्ज आहे.

OPPO F21 Pro स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 64MP प्राथमिक लेन्स, 2MP मायक्रोस्कोप लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देखील उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, तुम्हाला या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देखील मिळते, जी 33W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo