ओप्पो F1 स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी झाला उपलब्ध
ह्या स्मार्टफोनमध्ये 1.7Ghz चा ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि एड्रेनो 405GPU दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम दिली गेली आहे.
मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन F1 सादर केला आहे. हा स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. भारतीय बाजारात कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत १५,९९० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या F सीरिजचा पहिला स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ओप्पो F1 अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित कलरओएस 2.1 वर काम करेल आणि ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ५ इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा स्मार्टफोन अॅल्युमिनियम बॉडीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये 1.7GHz चा ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि एड्रेनो 405 GPU दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे.
स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर सह दिला गेला आहे. ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. कॅमे-यामध्ये आपल्याला अनेक ब्युटीफिकेशन फीचरसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये 2500 क्षमतेची बॅटरी मिळत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी पर्यायासाठी ह्यात 4G सह वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB दिला गेला आहे.
त्याचबरोबर कंपनी लवकरच ओप्पो F1 प्लस स्मार्टफोनदेखील विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात ५.५ इंचाची पुर्ण HD (1920×1080 पिक्सेल) डिस्प्ले,आणि 4GB ची रॅम देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन ओप्पो F1 पेक्षा उत्कृष्ट असा सेल्फी अनुभव देईल.
कंपनीने ह्याआधी ओप्पो R7 प्लसचा 4GB रॅमचा व्हर्जन लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनची किंमत ३,२९९ चीनी युआन (जवळपास ३४,३०० रुपये) आहे. कंपनीने सध्यातरी ह्याला चीनमध्ये सादर केले आहे. ह्या स्मार्टफोनची बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर केली जाऊ शकते.
हेदेखील वाचा – आसूस ट्रान्सफॉर्मर बुक T100HA लाँच
हे पाहा- १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स