ओप्पोने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन F1 प्लस लाँच केला त्यावेळी कंपनीने असे सांगितले होते की, एप्रिलच्या मध्यापर्यंत ह्याची बुकिंग सुरु केली जाईल. त्याचप्रमाणे आजपासून ह्या फोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु केली जाईल आणि हा फोन आपल्याला २० एप्रिलपर्यंत प्री-ऑर्डर बुक करु शकतो.
ह्याला प्री-ऑर्डर बुक करणा-यांना एक खास भेट दिली जाणार आहे आणि ह्यातील काहींना तर क्रिकेटपटू युवराज सिंहद्वारा साइन केलेले F1 प्लसचे एक स्पेशल व्हर्जनसुद्धा मिळू शकते. ह्या फोनची खास गोष्ट म्हणजे ह्यात १६ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. तसेच १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला आहे.
ओप्पो F1 प्लसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा फोन 2GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलियो P10 MT6755 प्रोसेसर आणि 4GB रॅंमने सुसज्ज आहे. ओप्पो F1 प्लसचा 64GB चा प्रकार उपलब्ध होईल. ह्या फोनचे अंतर्गत स्टोरेज 128GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB सारखे वैशिष्ट्ये दिली आहेत. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर डिस्प्लेच्या खाली आहे. हा 0.2 सेकंदात डिवाइसमध्ये अनलॉक करतो असा दावा केला गेला आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध होईल. फोनमध्ये 2850mAh ची बॅटरी दिली गेली आहे. F1 प्लससुद्धा VOOC फ्लॅश चार्जसह येतो. दावा केला गेला आहे की, हा ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये आपल्याला २ तासांचा टॉकटाइम देईल.
हेदेखील वाचा – ५००० च्या किंमतीत येणारे दोन बजेट स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – LeEco Le 2 स्मार्टफोन टीनावर लिस्ट,१६ मेगापिक्सेल कॅमे-याने सुसज्ज