4GB रॅमने सुसज्ज असलेला ओप्पो F1 प्लस स्मार्टफोन लाँच

4GB रॅमने सुसज्ज असलेला ओप्पो F1 प्लस स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा फोन 2GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलियो P10 MT6755 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ओप्पो F1 प्लसचा 64GB चा प्रकार उपलब्ध होईल. ह्या फोनचे अंतर्गत स्टोरेज 128GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात आपला नवीन फोन F1 प्लस लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या फोनची किंमत २६,९९० रुपये ठेवली आहे. हा फोन एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल.
 

ओप्पो F1 प्लसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा फोन 2GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलियो P10 MT6755 प्रोसेसर आणि 4GB रॅंमने सुसज्ज आहे. ओप्पो F1 प्लसचा 64GB चा प्रकार उपलब्ध होईल. ह्या फोनचे अंतर्गत स्टोरेज 128GB पर्यंत मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

ओप्पो F1 प्लस स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 178.1 डिग्री वाइड-अँगल्स लेन्स आणि f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा आहे. रियर कॅमे-यामध्ये PDAF आणि 4k व्हिडियो रेकॉर्डिंग फीचरसुद्धा आहेत. स्मार्टफोन कलरओएस 3.0 वर चालेल. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा ड्यूल सिम स्मार्टफोन हायब्रिड सिम स्लॉटसह येतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB सारखे वैशिष्ट्ये दिली आहेत. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर डिस्प्लेच्या खाली आहे. हा 0.2 सेकंदात डिवाइसमध्ये अनलॉक करतो असा दावा केला गेला आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध होईल. फोनमध्ये 2850mAh ची बॅटरी दिली गेली आहे. F1 प्लससुद्धा VOOC फ्लॅश चार्जसह येतो. दावा केला गेला आहे की, हा ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये आपल्याला २ तासांचा टॉकटाइम देईल.

हेदेखील वाचा – हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये

हेदेखील वाचा – १६ मेगापिक्सेलने सुसज्ज असलेला मिजू MX5E स्मार्टफोन ऑनलाइन साइटवर लिस्ट

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo