ओप्पोने आपला सेंट्रिक स्मार्टफोन ओप्पो F1 ला भारतात लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १५,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या लाँचसह आपल्या पुढील स्मार्टफोन ओप्पो F1 प्लससुद्धा भारतात लवकरच लाँच करेल. हा ओप्पो F1 चा नवीन प्रकार असेल. कंपनीने ह्या स्मार्टफोनविषयी काही विशेष माहिती दिली नाही. मात्र हा 5.5 इंचाच्या डिस्प्लेसह आणि 4GB रॅमने सुसज्ज असेल. कंपनीनुसार, ह्याला एप्रिलमध्ये लाँच केले जाईल आणि ह्याची किंमत २६,९९० रुपये असेल. ओप्पो F1 ला आपण फेब्रुवारीपासून खरेदी करु शकाल.
ओप्पो F1 अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित कलरओएस 2.1 वर काम करेल आणि ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ५ इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले दिली गेली आङे. हा स्मार्टफोन अॅल्युमिनियम बॉडीने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये 1.7GHz चा ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि एड्रेनो 405 GPU दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे.
स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर सह दिला गेला आहे. ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. कॅमे-यामध्ये आपल्याला अनेक ब्युटीफिकेशन फीचरसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये 2500 क्षमतेची बॅटरी मिळत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी पर्यायासाठी ह्यात 4G सह वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB दिला गेला आहे.
कंपनीने ह्याआधी ओप्पो R7 प्लसचा 4GB रॅमचा व्हर्जन लाँच केला होता. ह्या स्मार्टफोनची किंमत ३,२९९ चीनी युआन (जवळपास ३४,३०० रुपये) आहे. कंपनीने सध्यातरी ह्याला चीनमध्ये सादर केले आहे. ह्या स्मार्टफोनची बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर केली जाऊ शकते.
हेदेखील वाचा – आयबॉल स्लाइड गॉर्जियो 4GL टॅबलेट लाँच
हेदेखील वाचा – अखेर भारतात लाँच झाला ब्लॅकबेरीचा पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन प्रीव