मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन सादर केले. कंपनीने F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन स्मार्टफोनची किंमत १७,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या मर्यादित एडिशन स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ICC वर्ल्ड २०-२० चा लोगो दिला आहे. त्याचबरोबर ‘कॅच द सिक्स-ग्रॅब द सिक्स’ सारखे अनेक दुस-या स्पर्धांच्या माध्यमातून विजेत्यांना लिमिटेड एडिशन स्मार्टफोनसुद्धा मिळेल. ओप्पो 2016 ICC वर्ल्ड २०-२० मध्ये अधिकृत ग्लोबल पार्टनर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओप्पो F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन एक गिफ्ट किटसह येईल. ज्यात 2016 ICC वर्ल्ड २०-२० ची साखळी, सेल्फी स्टिक आणि ICC लोगो असलेले एक बॅक कव्हर असेल.
हेदेखील वाचा – ह्या ५ अॅप्सच्या माध्यमातून मिळेल ICC वर्ल्ड T20 इंडिया 2016 चे अपडेट्स
ओप्पो F1 स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप वर आधारित कलरओएस 2.1 वर काम करेल आणि ह्यात आपल्याला 5 इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोन अॅल्युमिनियम बॉडीने बनलेला आहे. स्मार्टफोनची डिस्प्ले गोरिला ग्लास 4 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये 1.7GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि एड्रेनो 405 GPU दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम दिली गेली आहे.
ओप्पो F1 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चरसह दिला गेला आहे. ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. कॅमे-यामध्ये आपल्याला अनेक ब्युटीफिकेशन फिचरसुद्धा मिळत आहे. फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे.
हेदेखील पाहा – कूलपॅड नोट 3 लाइटची पहिली झलक Video
हेदेखील पाहा – फोटो एडिटिंग करणारे ५ उत्कृष्ट अॅप्स