मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोन नवीन स्मार्टफोन F1ची प्री-बुकिंग सुरु केली आहे. कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनची डिलीवरी २१ जानेवारीला देईल. ओप्पोने आपल्या ह्या स्मार्टफोनला CES 2016 मध्ये सादर केले होते.
ओप्पोने F1 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा ड्यूल-सिम स्मार्टफोन 5 इंचाच्या IPS डिस्प्ले स्क्रीनसह येतो, जो HD (720×1280) देते. स्क्रीनच्या संरक्षणासाठी 2.5D गोरिल्ला ग्लास 4 ची कोटिंग दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 1.7Ghz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर, एड्रेनो 405 GPU आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात १३ मेगापिक्सेलच रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. हा अॅपर्चर f/2.2 सह येतो. तर दुसरीकडे फ्रंट फेसिंग कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे, ज्यात f/2.0 अॅपर्चर दिला आहे. स्मार्टफोन अॅनड्रॉईड व्हर्जन 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. स्मार्टफोनमध्ये अॅल्युमिनियम बॉडी दिली गेली आहे. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
ओप्पो F1 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. कंपनीने ह्याला पांढ-या/सोनेरी रंगात सादर केले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ, मायक्रो USB सारखे पर्याय दिले आहेत.