Oppo च्या दिवाळी हॉट डीलमध्ये बंपर ऑफरसह मिळतोय 5G फोन, तब्बल 12,000 रुपयांची सूट

Oppo च्या दिवाळी हॉट डीलमध्ये बंपर ऑफरसह मिळतोय 5G फोन, तब्बल 12,000 रुपयांची सूट
HIGHLIGHTS

Oppo च्या दिवाळी हॉट डीलमध्ये स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

तब्बल 12,000 रुपयांच्या सूटसह Oppo Reno 8 5G उपलब्ध

ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास 3 हजार रुपयांपर्यंतची आणखी सूट

सणासुदीच्या काळात, Oppo ने वापरकर्त्यांसाठी दिवाळीच्या हॉट डील देखील आणल्या आहेत. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह दिवाळी हॉट डीलमध्ये बंपर डिस्काउंटसह Oppo Reno 8 5G खरेदी करू शकता. 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 38,999 रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही 9 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. 

हे सुद्धा वाचा :  भारीच की, आता तुम्हाला WhatsApp ग्रुप कॉलसाठी लिंक शेअर करता येईल, नवीन फीचर जारी

दरम्यान, तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळेल. या दोन्ही ऑफरमुळे तुम्हाला दिवाळी हॉट डीलमध्ये फोन 12 हजार रुपयांमध्ये स्वस्तात मिळू शकतो.

Oppo Reno 8 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Oppo Reno 8 5G मध्ये कंपनीने 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.4-इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Mediatek Dimension 1300 चिपसेट पाहायला मिळेल.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनची बॅटरी 4500mAh आहे. ही बॅटरी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3, USB Type-C आणि NFC सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन कलर OS 12.1 वर काम करतो.

या व्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये वाइड अँगल कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्ससह मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. तर, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo