Oppo ने आजपासून 'Oppo फेस्टिव्ह ऑफर 2022' सेलची घोषणा केली आहे. या सणासुदीच्या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट आणि TWS इअरबड्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. Amazon, Flipkart, Oppo Store आणि काही ऑफलाइन रिटेलर्स यांसारख्या सर्व ऑनलाइन रिटेल चॅनेलवर डील्स उपलब्ध आहे. यासोबतच Oppo फेस्टिव्ह सेलमध्ये हे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 लाख रुपये जिंकता येतील. चला तर मग जाणून घेऊयात डील्सचे संपूर्ण तपशील…
हे सुद्धा वाचा : Flipkart Sale : आपोआप रद्द का होत आहेत ऑर्डर ? कंपनीने दिले उत्तर…
Amazon वर Oppo A54 फ्लॅट 10% सूट वर उपलब्ध आहे. तसेच, Oppo F सीरीजचे स्मार्टफोन सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI सह खरेदी केले जाऊ शकतात. त्यानंतर, Oppo A सिरीज स्मार्टफोन्ससाठी तीन महिन्यांचा नो कॉस्ट EMI उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरसाठी ग्राहक F21 प्रो सिरीजवर INR 2000, A77 वर INR 1500 आणि A57 वर INR 1000 ची सूट घेऊ शकतात. त्याबरोबरच, Amazon वर SBI कार्ड वापरून Oppo स्मार्टफोन्सवर 10% झटपट सूट मिळणार आहे.
OPPO K10 (6GB व्हेरिएंट) आणि K10 5G (8GB व्हेरिएंट) दोन्हीवर 1,500 रुपयांची सूट दिली जात आहे, तर OPPO F19 Pro+ वर 2,000 रुपयांची सूट दिली जाईल. त्याबरोबरच, जे ग्राहक Reno 8 Pro आणि Reno 8 एक्सचेंज ऑफरवर खरेदी करतील त्यांना अनुक्रमे 4,000 आणि 3,000 रुपयांचे फायदे मिळतील. एक्सचेंजमधून F21 Pro खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,000 रुपयांचा फायदा मिळेल. तसेच, ICICI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आहे कारण त्यांना रु. 5,000 वरील सर्व खरेदीवर 10% कॅशबॅक मिळेल. तर Oppo Pad Air 14,499 रुपयांमध्ये Axis/ICICI क्रेडिट कार्ड वापरून 2,000 रुपये आणि 1,500 रुपये कॅशबॅक उपलब्ध असेल.
Oppo F सीरीजचे स्मार्टफोन सहा महिन्यांपर्यंतच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी केले जाऊ शकतात. ग्राहकांना 'पे नथिंग ऑफर' वापरून डाउन पेमेंट भरावे लागणार नाही. Oppo Reno8 सिरीज, F21 सिरीज, A77 आणि A57 स्मार्टफोन्सच्या खरेदीवर ग्राहक 3000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील घेऊ शकतात.