आता जिकडे तिकडे सर्व स्मार्टफोन कंपन्या आपल्या स्मार्टफोन्समध्ये AI टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक फीचर्स आणण्याची तयारी करत आहे. यासह स्मार्टफोन तंत्रज्ञान दररोज नवनवीन आकर्षक फीचर्स तयार करत आहेत. जेव्हापासून स्मार्टफोनमध्ये AI क्षमता सादर केली जात आहे, तेव्हापासून स्मार्टफोनचे मूळ देखील बदलत आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोन वापरण्याची पद्धतही बदलत आहे.
हे सुद्धा वाचा: Latest Smartphones under 25000: मिड बजेट रेंजमध्ये येतात OnePlus पासून ते Nothing पर्यंत नवीनतम Powerful स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News
दरम्यान, एक नवीन वृत्त समोर येत आहे की, Oppo ने आपल्या स्मार्टफोन्ससाठी AI Eraser सादर केला आहे, हे टूल Oppo Reno 11 सीरीजमध्ये आणले जाणार आहे. होय, प्रेस रिलीजमध्ये असेही म्हटले गेले आहे की, Reno 11 सीरीज ही पहिली स्मार्टफोन सीरीज असेल, जी प्रगत म्हणजेच ऍडव्हान्स AI इमेज एडिटिंग टूल्ससह येईल.
Oppo ने आपण सर्कलच्या मदतीने AI इरेजर वापरून कोणतीही वस्तू कशी काढू शकता, हे स्पष्ट केले आहे. खरं तर, AI च्या मदतीने ते हे सर्कल ओळखून इमेजमधून ते ऑब्जेक्ट रिमूव्ह केली जाते. यानंतर, हे रिमूव्ह केलेले एरिया देखील नैसर्गिक दिसणाऱ्या कंटेंटने भरले जाते. यासह तुमचे फोटो अगदी नैसर्गिकरित्या काढलेले आहे, असेच दिसणार आहे. Oppo ने म्हटले आहे की, इतर ऑब्जेक्ट रिमूव्हल टूल्स विशेषत: Reno 11 सिरीजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Oppo Reno 11 या सीरिजच्या फोनमध्ये Reno 11 Pro, Reno 11 आणि Reno 11F यांचा समावेश आहे. Oppo ने सादर केलेले AI Eraser फीचर एप्रिल 2024 मध्ये OTA अपडेटद्वारे या स्मार्टफोन्समध्ये आणली जाईल. एवढेच नाही तर, भारतीय बाजारात OnePlus ने OnePlus स्मार्टफोन्सवर AI इरेजर टूल देखील आणले गेले आहे. OnePlus 12, OnePlus 12R, OnePlus 11 आणि OnePlus Open व्यतिरिक्त हे फिहकर OnePlus Nord CE 4 मध्ये मिळू शकते.