50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्ससह Oppo चा Affordable 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्ससह Oppo चा Affordable 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

आपला नवीन परवडणारा स्मार्टफोन Oppo A79 5G भारतात लाँच केला आहे.

नवीन Oppo A79 5G आजपासून तुम्ही प्री-बुक करू शकता.

या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे.

सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo परवडणाऱ्या रेंजमध्ये अप्रतिम फोन देण्यासाठी लोकप्रिय आहे. कंपनीने आज आपला नवीन परवडणारा स्मार्टफोन Oppo A79 5G भारतात लाँच केला आहे. Oppo चा हा बजेट फोन Oppo A78 5G चा अपग्रेड मॉडेल आहे, जो वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता. मागील मॉडेलच्या तुलनेत Oppo च्या या फोनच्या मागील बाजूस एक नवीन डिझाइन केलेले कॅमेरा मॉड्यूल आहे. चला तर मग बघुयात नव्या फोनची किंमत आणि स्पेसीफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: OnePlus Open ची पहिली सेल भारतात सुरू, पहिल्याच दिवशी मिळतोय तब्बल 11 हजार रुपयांपर्यंत Discount। Tech News

Oppo A79 5G किंमत

Oppo चा हा बजेट स्मार्टफोन 8GB RAM + 128GB या एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनची किंमत 19,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तसेच, हे 3,333 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI सह खरेदी केले जाऊ शकते.

Oppo A79 5G Launched in india
Oppo A79 5G Launched in india

उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअर तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे विकला जाईल. फोन ग्लोइंग ग्रीन आणि मिस्ट्री ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन 28 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आजपासून तुम्ही ते प्री-बुक करू शकता.

Oppo A79 5G

Oppo च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि FHD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, याचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोनमध्ये मध्यभागी संरेखित पंच-होल डिझाइन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसर उपलब्ध आहे.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 33W SuperVOOC USB Type C फास्ट चार्जिंग फीचर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश लाइट उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP मुख्य आणि 2MP दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे.

फोन 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB UFS2.2 अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनचे अंतर्गत स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. हा फोन ब्लूटूथ 5.3, वाय-फाय, 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. याशिवाय यात IPX4 म्हणजेच वॉटर स्प्लॅश प्रोटेक्शन फीचर देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo