Oppo ने गेल्या वर्षी लाँच केलेल्या A-Series स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर Oppo चा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त झाला आहे. होय, चीनी स्मार्टफोन निर्मात्याने Oppo A78 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. कमी किमतीत या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटद्वारे समर्थित आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo A78 स्मार्टफोनची नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: लाँचपूर्वीच OnePlus Nord CE 4 चे विशेष फीचर्स उघड, कंपनीने स्वतः Officially केले कन्फर्म! Tech News
वर सांगितल्याप्रमाणे, Oppo ने हा Oppo A78 स्मार्टफोन गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन 18,999 रुपये किमतीत लाँच केला होता. आता या मिड-रेंज डिव्हाईसच्या किमतीत 3,500 रुपयांची मोठी कपात झाली आहे. या कपातीनंतर, ग्राहक हा हँडसेट आता केवळ 15,499 रुपयांना खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, Oppo A78 स्मार्टफोन Aqua Green आणि Mist Black कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Oppo चा हा स्मार्टफोन 6.5-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. हा परवडणारा फोन सुरळीत कामकाजासाठी ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेजद्वारे समर्थित आहे. ही स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
Oppo A78 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये f1.8 अपर्चरसह 50MP मेन सेन्सर आणि f/2.4 अपर्चरसह 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी घेण्यासाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. सुरक्षिततेसाठी हा डिव्हाइस साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे.