Oppo 5G Phone Price Cut: 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात, बघा नवी किंमत। Tech News
OPPO A79 5G आणि OPPO A78 5G फोनच्या किमतीत कपात
हे दोन्ही स्मार्टफोन्स 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येतात.
या दोन्ही फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे.
Oppo India ने आपल्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट दिले आहे. कंपनीने आज दोन 5G स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. होय, कंपनीने OPPO A79 5G आणि OPPO A78 5G फोनची किंमत थेट 1,000 रुपयांनी कमी केली आहे. या किमतीत कपात केल्यानंतर हे दोन्ही Oppo मोबाईल आजपासूनच नवीन दराने खरेदी करता येतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही स्मार्टफोन्स 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर-
हे सुद्धा वाचा: आगामी Moto G04 ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, AI कॅमेरासह मिळेल मजबूत बॅटरी। Tech News
OPPO A79 5G ची नवी किंमत
OPPO A79 5G स्मार्टफोन भारतात 19,999 रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. वर सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा स्मार्टफोन तुम्हाला 18,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo A79 5G फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंच लांबीचा फुल HD + पंच-होल डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंग मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP ISOCELL JN1 मुख्य सेन्सर आहे. जो AI सह येतो. तसेच, 8MP चा सेल्फी कॅमेरा देखील आहे. पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानावर काम करते.
OPPO A78 5G ची नवी किंमत
OPPO A78 5G स्मार्टफोन भारतात 18,999 रुपयांमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. वर सांगितल्याप्रमाणे, या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा स्मार्टफोन तुम्हाला 17,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Oppo A78 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेवर लाँच करण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. प्रक्रियेसाठी, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आहे. हा फोन 8GB रॅम आणि 8GB रॅम विस्तार तंत्रज्ञान आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हा फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. हा फोन 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile