भारीच की ! Oppo A77s जबरदस्त स्मार्टफोनच्या किमतीत घट, बघा नवे दर

Updated on 07-Jun-2023
HIGHLIGHTS

OPPO A77s स्मार्टफोनच्या किमतीत कपात

Oppo A77s च्या किमतीत 1,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

नवी किंमत 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची आहे.

OPPO ने OPPO A77s स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या 'A' सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. हा मोबाइल फोन 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला गेला होता. मात्र आज, Oppo ने A77S ची किंमत कमी केली आहे आणि हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. 

Oppo A77s ची नवी किंमत

Oppo A77s च्या किमतीत 1,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा मोबाइल फोन 17,999 रुपयांच्या किमतीत लाँच झाला होता. मात्र, किमतीत कपात झाल्यानंतर हा फोन 16,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन सनसेट ऑरेंज आणि स्टाररी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. 

Oppo A77s चे तपशील

Oppo A77S स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन Android आधारित Color OS 12.1 वर लाँच केले गेले आहे. त्याबरोबरच, हा फोन Qualcomm Snapdragon 680 octa-core प्रोसेसर 8GB RAM + 128GB स्टोरेजसह आहे. या फोनमध्ये 5GB व्हर्च्युअल रॅम देखील आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि F/2.4 अपर्चर 2MP मोनो लेन्स देखील देण्यात आला आहे. तसेच, फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या Oppo फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :