Oppo चा नवा पॉवरफुल फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल 50MP कॅमेरा आणि बरंच काही

Oppo चा नवा पॉवरफुल फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळेल 50MP कॅमेरा आणि बरंच काही
HIGHLIGHTS

Oppo A77 4G भारतात लाँच

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 15,499 रुपये

स्मार्टफोन कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइट आणि ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध

स्मार्टफोन ब्रँड Oppo ने आपला नवीन फोन Oppo A77 4G भारतात लाँच केला आहे. Oppo ने MediaTek Helio G35 प्रोसेसरसह त्याचा नवीनतम A-सिरीज स्मार्टफोन सादर केला आहे. फोनमध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी आहे.  जाणून घेऊयात, Oppo A77 4G फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती…

हे सुद्धा वाचा : जबरदस्त फीचर्ससह OnePlus 10T 5G आज होणार लाँच, येथे बघा लाइव्ह स्ट्रीमिंग

Oppo A77 4G 

Oppo A77 4G Android 12 आधारित ColorOS 12.1 सह येतो. फोनमध्ये 6.56-इंच लांबीचा HD + LCD डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. Oppo A77 4G मध्ये Octa core MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येते. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये अल्ट्रा-लिनियर स्टीरिओ स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि 33W सुपर-वूक फास्ट चार्जरला सपोर्ट  करेल. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये USB टाइप-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, 4G VoLTE, Wi-Fi आणि ब्लूटूथचा सपोर्ट आहे.

Oppo A77 4G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 50 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश लाइट देखील दिसत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo A77 4G किंमत

 फोन फक्त एका स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 64 GB स्टोरेजसह त्याच्या 4 GB रॅमची किंमत 15,499 रुपये आहे. Oppo A77 4G कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइट आणि ऑफलाइन मार्केटमधून देखील खरेदी केला जाऊ शकतो. ICICI बँकेच्या कार्डवरून फोन घेतल्यावर 10 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. Oppo A77 4G स्काय ब्लू आणि सनसेट ऑरेंज कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo