ओप्पो A59 स्मार्टफोन लाँच, 3GB रॅमने सुसज्ज
ह्यात 1.5GHz ऑक्टा-कोर कॉर्टेक्स-A53 मिडियाटेक MT6570 प्रोसेसरसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात माली-T860 GPU आणि 3GB रॅम देण्यात आले आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी ओप्पोने बाजारात आपला नवीन फोन A59 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 18 जूनपासून चीनच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या फोनमध्ये 5.5 इंचाची IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन HD आहे आणि पिक्सेल तीव्रता 267ppi आहे.
ओप्पो A59 स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर कॉर्टेक्स-A53 मिडियाटेक MT6570 प्रोसेसरसुद्धा आहे. त्याचबरोबर ह्यात माली-T860 GPU आणि 3GB रॅम देण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्या डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. तथापि, ह्या डिवाइसच्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकत नाही. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालेल.
हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स
फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा 1080p व्हिडियो रेकॉर्ड करु शकता. ह्या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फोनमध्ये 3075mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनला मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ब्लूटुथ, वायफाय, मायक्रो-यूएसबी पोर्ट (OTG रेडी) आणि 3.5mm ऑडियो जॅकसारखे फीचर्स दिले गेले आहेत. ह्या फोनची किंमत $274 ठेवण्यात आली आहे आणि हा गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये