Good News! Oppo च्या लोकप्रिय 5G स्मार्टफोनच्या किमतीत घट, जाणून घ्या नवी किंमत। Tech News

Updated on 08-Feb-2024
HIGHLIGHTS

Oppo ने डिसेंबर 2023 मध्ये भारतात बजेट हँडसेट Oppo A59 5G लाँच केला होता.

Oppo A59 5G स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत कपात

हा फोन MediaTek Dimension 6020 चिपसेटवर काम करतो.

जर तुम्ही Oppo कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट रेंजमध्ये स्मार्टफोन हवा असेल तर, हीच योग्य वेळ असेल. Oppo ने गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये भारतात बजेट हँडसेट Oppo A59 5G लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने या स्मार्टफोनचा किंमतीत कपात केलेली आहे. या फोनच्या किमतीत 1000 रुपयांची घट करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo A59 5G ची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Asolutely Lowest! itel P55 सिरीज भारतात लाँच, कमी किमतीत अगदी Powerful फीचर्स उपलब्ध

Oppo A59 5G ची भारतीय किंमत

Oppo A59 5G स्मार्टफोन 4GB आणि 6GB मेमरी व्हेरिएंटसह येतो. या फोनच्या 4GB व्हेरिएंटच्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे, तर 6GB व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. किमतीत कपात केल्यानंतर फोनचा 4GB व्हेरिएंट 13,999 रुपये आणि 6GB व्हेरिएंट 15,499 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन सिल्क गोल्ड आणि स्टाररी ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Oppo A59 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo A59 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलवर बनवली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटसह येते. हा स्मार्टफोन Android 13 OS वर लॉन्च करण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimension 6020 चिपसेटवर काम करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 4GB RAM आणि 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच, फोनमध्ये 6GB RAM विस्तार तंत्रज्ञान देखील आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. या फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP इतर लेन्स आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे आणि ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी त्यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :