Oppo A59 5G च्या किमतीत मोठी कपात, नव्या किमतीसह तुमच्या बजेटमध्ये खरेदी करा Latest स्मार्टफोन। Tech News
OPPO A59 5G गेल्या वर्षी 2023 डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच झाला होता.
फोन लाँच झाल्याच्या एका महिन्याच्या आत किमतीत कपात
फोनवर 1,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI
Oppo ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन OPPO A59 5G गेल्या वर्षी 2023 डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच केला होता. नवीनतम स्मार्टफोन स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लक्षात घ्या की, फोन लाँच झाल्याच्या एका महिन्याच्या आत या फोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. होय, आता तुम्ही हा नवीन फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.
हे सुद्धा वाचा: Its Here! बहुप्रतीक्षित Oppo Reno11 Series भारतात लाँच, स्मार्टफोनची प्री-ऑर्डर देखील सुरु। Tech News
Oppo A59 5G ची नवी किंमत
एका अहवालानुसार, ऑफलाइन स्टोअरवरून मिळालेल्या माहितीनुसार OPPO A59 5G च्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 1,500 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यासह बेस मॉडेल 4GB RAM सह 128GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये आहे. पूर्वी या फोनची किंमत 14,999 रुपये होती. तर, फोनचा हाय व्हेरिएंट 6GB रॅम + 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची नवी किंमत 15,499 रुपये इतकी आहे. पूर्वी या व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये होती.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 1,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आणि 6 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI अनेक बँक ऑफर्ससह उपलब्ध आहेत.
Oppo A59 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo A59 5G फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइलवर बनवली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. हा स्मार्टफोन स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी MediaTek Dimension 6020 चिपसेटवर काम करतो. हा ऑक्टाकोर प्रोसेसर 2.2 GHz पर्यंत क्लॉक स्पीडने चालू शकतो. ग्राफिक्ससाठी यात Mali-G57 GPU आहे. फोनमध्ये 4GB आणि 6GB RAM ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 6GB RAM विस्तार टेक्नॉलॉजी देखील आहे. हा स्मार्टफोन 128GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी Oppo A59 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्याच्या मागील पॅनलवर, LED फ्लॅशसह सुसज्ज 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. तसेच, फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 7 5G बँडला सपोर्ट करतो. त्याबरोबरच, यामध्ये 3.5mm जॅक, साइड फिंगरप्रिंट सेन्सर, IP54 रेटिंगसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile