प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Oppo ने भारतात नवीन A-सीरीज डिवाइस Oppo A59 लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये म्हणजेच 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये उत्तम व्युइंग एक्सपेरियन्ससाठी तुम्हाला HD डिस्प्ले मिळणार आहे. यासह, फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. Oppo च्या नवीन फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात.
Oppo च्या नव्या Oppo A59 5G ची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI, IDFC, बँक ऑफ बडोदा आणि AU फायनान्स बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर तुम्हाला 1500 रुपयांची झटपट सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर, या फोन 1,699 रुपयांची EMI देखील ऑफर केली जाईल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा फोन अधिकृत स्टोअर्स, तसेच इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्ट आणि Amazon वरून खरेदी करता येईल.
Oppo चा नवीन स्मार्टफोन आकर्षक डिझाईनसह येतो. Oppo A59 5G फोनमध्ये 6.56 इंच HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 GPU आहे. यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल,जी SD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. हा मोबाइल फोन Android 13 आधारित OS वर काम करतो.
Oppo A59 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13MP मेन लेन्स आणि 2MP बोकेह सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये HDR आणि नाईट मोड सारखे अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह चार्ज होऊ शकते.
फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ड्युअल सिम, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सिक्योरिटीसाठी फोनमध्ये फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर मिळतील. तसेच, सुपरपॉवर सेव्हिंग मोड आणि अल्टिमेट स्टँडबाय मोड देखील आहे.