Oppo ने आपला नवीन A-सिरीज स्मार्टफोन Oppo A58 5G चीनमध्ये लॉन्च केला आहे. मिड-रेंज हँडसेट 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले दाखवतो. हा फोन Octa-core MediaTek Dimensity 700 प्रोसेसरवर काम करतो. त्याबरोबरच, या फोनमध्ये तुम्हाला डुअल-मोड 5G सपोर्ट देखील मिळत आहे. या Oppo 5G स्मार्टफोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे सुद्धा वाचा : सलमानसोबत त्याच्या 2 सुपरहिट हिरोइन्स दिसणार, 'किसी का भाई किसी की जान'मध्ये 'या' अभिनेत्रींची एन्ट्री
Oppo A58 5G चीनमध्ये प्री-बुकिंगसाठी Oppo China ऑनलाइन स्टोअरद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये ऑफर करण्यात आला आहे. याशिवाय त्याची किंमत CNY 1,699 म्हणजेच अंदाजे रुपये 19,000 आहे. ओप्पोचा हा हँडसेट स्टार ब्लॅक, ब्रीझ पर्पल आणि ट्रॅनक्विल सी ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo A58 5G मध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 90Hz पर्यंत रिफ्रेश दरासह 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, Oppo A5G 5G ला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP पोर्ट्रेट सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरसह 8MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
हा 5G फोन 5,000mAh बॅटरीसह येतो, हा 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह कंपनीने सादर केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोन 8.5 तासांचा गेमिंग टाइम देण्यास सक्षम आहे.