Oppo A58 4G स्मार्टफोन आज 8 ऑगस्ट रोजी भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन आहे, जो 15 हजारांपेक्षा कमी रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. Oppo A सीरीजच्या या नवीन फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Oppo A58 4G फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व फीचर्सशी संबंधित तपशील पुढे बघुयात.
Oppo A58 4G स्मार्टफोन केवळ एकाच 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोन काळ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.
हा फोन फ्लिपकार्टवर 5000 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो कॉस्ट EMI पर्यायांसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ICICI, HDFC आणि कोटक बँकेसह काही निवडक बँकांमधील कार्डधारक अतिरिक्त सवलती आणि ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
Oppo A58 4G 6.72-इंच FHD+ LCD स्क्रीनसह येतो, जी 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 680 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह येईल. LCD डिस्प्लेसह तुम्हाला बेस्ट व्युइंग अँगल मिळेल. हे कमी किमतीचे आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे आणि त्याचा पॉवर वापर फार कमी आहे. Oppo A58 4G मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 12nm प्रोसेसर मिळत आहे, जो 1000MHz ARM Mali-G52 2EEMC2 GPU सह जोडलेला आहे.
या हँडसेटला 6GB LPDDR4X रॅमसह 128GB eMMC 5.1 स्टोरेजचा सपोर्ट मिळत आहे आणि मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, Oppo A58 4G Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर चालतो.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo A58 4G च्या मागील बाजूस असलेल्या ड्युअल कॅमेरा युनिटमध्ये 50 MP चा प्राथमिक सेन्सर आणि 2-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे. बॅक कॅमेरा आणि LED फ्लॅश युनिट पॅनलच्या वरच्या डाव्या कोपर्यात उभ्या मॉड्यूलमध्ये ड्युअल सर्क्युलर रिंगमध्ये ठेवलेले आहेत. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP चा कॅमेरा फ्रंटला उपलब्ध आहे. जर तुम्ही सेल्फीचे शौकीन असाल, तर 8MP कॅमेरा योग्य आहे.
Oppo A58 4G ला पॉवर देण्यासाठी, त्यात 5000mAh बॅटरी समाविष्ट करण्यात आली आहे, जी 33W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. वेब सर्फ करणे आणि ईमेल तपासणे यासारखी मूलभूत कार्ये करताना एकाच चार्जवर बॅटरी दोन दिवस टिकेल. सिक्योरिटीसाठी, हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. याशिवाय, हँडसेट ब्लूटूथ v5.3, 4G, NFC, GPS आणि USB टाइप-सी कनेक्टिव्हिटी देते. यासोबतच तुम्हाला 3.5mm ऑडिओ जॅक देखील मिळत आहे.