Oppo भारतात आपला नवीन A सीरीज स्मार्टफोन Oppo A57e लाँच करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत फोनच्या लाँच डेट द्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एका लीकमध्ये या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीसह त्याचे डिझाइन समोर आले आहे. लीकनुसार, हा फोन या वर्षी जूनमध्ये लाँच झालेल्या Oppo A57 सारखा दिसेल. कंपनी फोनची किंमत जवळपास 15,000 रुपये ठेवण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : Jio AIRFIBER: काय आहे हे अनोखे उपकरण, कशाप्रकारे करेल काम? जाणून घ्या डिटेल्स
काही दिवसांपूर्वी टिपस्टर पारस गुगलानी यांनी सांगितले होते की, कंपनी हा फोन भारतात 13,999 रुपयांच्या किंमतीसह लाँच करू शकते. फोनचे डिझाइन रेंडर दर्शविते की, हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह डिस्प्लेसह येईल. बॉटममध्ये तुम्हाला काही ठीक बेझल्स पाहायला मिळतील. कंपनी फोनच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम की ऑफर करत आहे. तसंच, याचे पॉवर बटण उजव्या बाजूला दिलेले आहे.
लीकनुसार, फोटोग्राफीसाठी कंपनी LED फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देणार आहे. तुम्हाला फोनमध्ये रेक्टॅंगल कॅमेरा मॉड्यूल दिसेल. यामध्ये मोठ्या कटआउटमध्ये दोन सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये किती मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंपनी यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्याची शक्यता आहे.
सेल्फीसाठी, फोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. त्याचप्रमाणे, हा Oppo फोन 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी मिळू शकते.