Oppo A5 स्मार्टफोन या दमदार फीचर्स सह TENNA वर दिसला

Updated on 05-Jul-2018
HIGHLIGHTS

Oppo A5 स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर यात स्नॅपड्रॅगन 450 असेल, हि माहिती TENAA च्या लिस्टिंग वरून समोर आली आहे.

Oppo A5 Device to come up with Snapdragon 450 TENAA Listing Reveals: Oppo ने काही दिवसांपूर्वी आपला Realme 1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा डिवाइस बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा स्मार्टफोन आपल्या स्पेक्स आणि फीचर्स मुळे Xiaomi च्या स्मार्टफोंसना टक्कर देत आहे. पण आता असे वाटत आहे की कंपनी आपल्या बजेट सेगमेंट वर जास्त लक्ष देत आहे आणि या सेगमेंट मध्ये अजूनही फोन येतील. कारण कंपनी कडून एका नवीन बजेट स्मार्टफोन च्या रुपात Oppo A5 पण लॉन्च केला जाणार असल्याची बातमी आहे. 

हा डिवाइस सध्या TENAA वर दिसला आहे. याची एक इमेज पण या लिस्टिंग मधून समोर आली आहे, जी हॉरिजॉन्टल ड्यूल कॅमेरा सह दिसत आहे. त्याचबरोबर यात एक सिंगल फ्लॅश पण तुम्हाला मिळणार आहे, जो कॅमेरा च्या बाजूला दिसत आहे. 

Oppo A5 डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस बद्दल याआधी पण अनेकदा माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार डिवाइस मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाची नॉच असलेली HD+ स्क्रीन मिळणार आहे, याचे स्क्रीन रेजोल्यूशन A3 डिवाइस पेक्षा कमी असू शकते. लीक लक्ष देऊन पाहिल्यास या डिवाइस मध्ये तुम्हाला एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 540 चिपसेट मिळणार आहे. तसेच याच्या बॅक वर या लीक नुसार एक ड्यूल कॅमेरा सेटअप पण असेल. हा कॅमेरा 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या सेंसर चा कॉम्बो असू शकतो. 

तसेच या लीक नुसार असे पण समोर येत आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला फेस अनलॉक फीचर मिळेल, जो तुमची बायोमेट्रिक सुरक्षा वाढवतो. हा डिवाइस प्रामुख्याने 4GB रॅम सह 64GB च्या इंटरनल स्टोरेज सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. असे पण बोलले जात आहे की हा डिवाइस एंड्राइड च्या लेटेस्ट वर्जन एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च केला जाऊ शकतो. अजूनतरी या डिवाइस ची किंमत समजली नाही पण लवकरच तीही समोर येईल अशी आशा आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :