प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO A3x 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज भारतात OPPO A3x 5G स्मार्टफोन लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा नवीन A-सिरीजचा स्मार्टफोन बजेट श्रेणीअंतर्गत सादर करण्यात आला आहे. OPPO A3x 5G भारतीय बाजारपेठेत Xiaomi, Vivo आणि Realme च्या मोबाईल स्मार्टफोन्सना जबरदस्त टक्कर देणार, असे म्हटले जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात OPPO A3x 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
OPPO A3x 5G च्या 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,499 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून खरेदी करता येईल. या मोबाईलचे 4GB + 64GB स्टोरेज मॉडेल देखील लवकरच भारतीय बाजारात लाँच केले जाऊ शकते, ज्याची किंमत 12,499 रुपये असण्याची शक्यता आहे.
OPPO A3x 5G स्क्रीन 6.67 इंच लांबीची आहे, जी 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 1000 nits च्या पीक ब्राईटनेससह सादर करण्यात आली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये ARM Mali-G57 GPU सोबत MediaTek Dimensity 6300 चिप देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे, जे SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. Oppo A3X ची बॉडी खूप मजबूत आहे. फोनला IP54 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच हा फोन धूळ आणि जलरोधक आहे.
फोटोग्राफीसाठी, या Oppo च्या लेटेस्ट फोनमध्ये सिंगल 8MP रिअर कॅमेरा आहे, तर सेल्फीसाठी, हँडसेटमध्ये 5MP कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅश लाईट देखील आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह सपोर्ट येते. तसेच, सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर आहे.