Oppo ने नवीनतम Oppo A3x 4G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला.
Oppo A3x 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.
Oppo A3x 4G स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला गेला आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने नवीनतम Oppo A3x 4G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने ऑगस्टमध्ये या स्मार्टफोनचा 5G व्हेरिएंट सादर केला होता. आता Oppo ने या स्मार्टफोनचा 4G व्हेरियंट देखील बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला गेला आहे. जाणून घेऊयात Oppo A3x 4G ची भारतीय किंमत आणि सर्व तपशील-
Oppo A3x 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 9,999 रुपये इतकी देण्यात आली आहे. हा फोन ओशन ब्लू आणि नेबुला रेड या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने Oppo India च्या X म्हणजेच अधिकृत ट्विटर अकाउंटवरून Oppo A3x 4G लाँचबाबतर माहिती दिली आहे.
Oppo A3x 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo A3x 4G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1000 nits आहे. फोनमध्ये पंच होल कटआउट देखील उपलब्ध आहे. तसेच, उत्तम परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 1 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4GB रॅमसह 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोन Android 14 वर आधारित ColorOS 14 वर कार्य करेल. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, Oppo A3x 4G फोनच्या मागील बाजूस 8MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तर, त्याच्या मागील बाजूस LED फ्लॅश स्थापित करण्यात आला आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 5MP कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 45W SuperVOOC वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 5100mAh बॅटरी आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.