Oppo A3s चा नवीन मॉडेल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत
Oppo ने आपल्या Oppo A3s स्मार्टफोन चा 3GB रॅम आणि 32GB मॉडेल भारतात लॉन्च केला आहे. Oppo चे हे स्मार्टफोंस तुम्ही ऑफलाइन आणि फ्लिपकार्ट च्या माध्यमातून विकत घेऊ शकता.
गेल्या महिन्यात Oppo ने भारतात आपला Oppo A3s स्मार्टफोन लॉन्च केला होता, आणि जवळपास एका महिन्यातच कंपनी ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माहिती दिली आहे की कंपनी ने या डिवाइस चा एक नवीन मॉडेल म्हणजे 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट लॉन्च केला आहे.
Oppo ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून या मॉडेल च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. हे ट्विट तुम्ही इथे बघू शकता.
Oppo A3s च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये एक 6.2 इंचाचा HD+ सुपर फुल स्क्रीन डिस्प्ले आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच पण देण्यात आली आहे. डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 ओक्टा-कोर चिपसेट आहे आणि या डिवाइस मध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज आहे, तसेच आता हा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे, ही स्टोरेज तुम्ही माइक्रो SD कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता.
ऑप्टिक्स पाहता, स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सल च्या प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल च्या सेकेंडरी सेंसर सह येतो. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8 मेगापिक्सल चा सेंसर देण्यात आला आहे जो AI ब्यूटी टेक्नोलॉजी 2.0 सह येतो.
डिवाइस मध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि कनेक्टिविटी साठी डिवाइस डुअल-सिम कार्ड स्लॉट, 4G VoLTE, Wi-Fi आणि ब्लूटूथ ला सपोर्ट करतो. Oppo A3s एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित कलर OS 5.1 वर चालतो. डिवाइस मध्ये एक म्यूजिक पार्टी नावाचा फीचर देण्यात आला आहे ज्यामुळे A3s यूजर्स एक साथ म्यूजिक प्ले करून सिंक करू शकतात ज्यामुळे आवाज वाढवता येतो. या नवीन वेरिएंट च्या किंमती बद्दल बोलायचे तर हा जवळपास Rs 13,990 मध्ये विकत घेता येईल, तसेच याचा आधीचा मॉडेल Rs 10,990 मध्ये विकत घेता येईल.