Oppo A3s Device to Launch in India soon Specs and Features leak ahead of Launch: Oppo ने मागच्या वर्षी एप्रिल मध्ये आपला एक अफोर्डेबल स्मार्टफोन Oppo A3 लॉन्च केला होता, आता असे वाटत आहे की कंपनी या स्मार्टफोन च्या जेनेरेशन मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे, जो Oppo A3s नावाने इंटरनेट वर दिसला आहे. या स्मार्टफोन बद्दल याच्या लॉन्च च्या आधी भरपूर माहिती इंटरनेट वर लीक झाली आहे, आता या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल पण एक लीक दिसला आहे.
Oppo A3s स्मार्टफोन च्या लीक स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर MySmartPrice च्या एका रिपोर्ट नुसार हा डिवाइस म्हणजे Oppo A3s स्मार्टफोन एका 6.2-इंचाच्या HD+ डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट आणि एड्रेनो 506 GPU सह लॉन्च केला जाणार आहे. तसेच यात तुम्हाला 3GB चा रॅम मिळणार आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला 32GB ची स्टोरेज मिळेल, या लिस्टिंग वरून समोर येत आहे की डिवाइस मध्ये एक माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही याची स्टोरेज 128GB पर्यंत वाढवू शकता.
फोटोग्राफी साठी स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा मिळू शकतो, त्याचबरोबर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळू शकतो. फोन मध्ये तुम्हाला एक 4,230mAh क्षमता असलेली बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये ड्यूल-सिम कनेक्टिविटी मिळत आहे, तसेच यात तुम्हाला ब्लूटूथ 4.2 आणि GPS सपोर्ट मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला एंड्राइड 8.1 Oreo चा सपोर्ट मिळणार आहे, जो कलरOS 5.1 वर आधारित असेल.
या रिपोर्ट मध्ये असेही सांगण्यात आले आहे की हा डिवाइस भारतात जुलै मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, तसेच याच्या 3GB वेरिएंट ची किंमत Rs 12,999 असण्याची शक्यता आहे.