स्मार्टफोन ब्रँड ओप्पो ने आपल्या Oppo A3s स्मार्टफोनचा एक नवीन वेरिएंट अलीकडेच लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये लॉन्च केला होता. तेव्हा हा 2GB RAM+ 16GB storage आणि 3GB RAM + 32GB स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला होता पण आता यूजर्स हा फोन 4GB RAM/64GB वेरिएंट मध्ये पण विकत घेऊ शकतील.
कंपनीने हा फोन भारतात 9,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे स्पेसिफिकेशंसच्या बाबतीत हा नवीन वेरिएंट जुन्या वेरिएंट्स प्रमाणे आहे.
91Mobiles च्या रिपोर्ट्स नुसार हा फोन यूजर्स सर्व मोठ्या रिटेल स्टोर वरून विकत घेऊ शकतात. पण ऑनलाइन हा कुठून विकत घेता येईल, याची माहिती मिळालेली नाही. डिवाइस Red आणि Purple रंगात विकत घेता येईल.
Oppo A3s चे नवीन स्पेक्स पाहता यात तुम्हाला 6.2-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो ज्याचे रेजॉल्यूशन 720×1520 पिक्सल आहे. स्मार्टफोन मध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पो चा हा डिवाइस एंड्रॉइड 8.1 ओरियो बेस्ड ColorOS 5.1 सह येतो. Oppo A3s मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 SoC देण्यात आला आहे.
ऑप्टिक्स मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेकंडरी सेंसर आहे. फोन मध्ये 8-मेगापिक्सल सेंसरचा फ्रंट कॅमेरा आहे जो AI ब्यूटी टेक्नोलॉजी 2.0 सह येतो. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून तुम्हाला फोन मध्ये 4जी VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो.