ओप्पोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन A37 लाँच केला. सध्यातरी ह्या फोनला चीनमध्ये लाँच केले आहे आणि ह्याची किंमत CNY 1,299 (जवळपास 13, 300 रुपये) आहे. तथापि ह्या फोनला चीनशिवाय दुस-या बाजारात लाँच करण्याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
ह्यात 5 इंचाची HD IPD डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. हा स्मार्टफोन कलर ऑपरेटिंग सिस्टम 3.0 वर चालतो. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
ह्या स्मार्टफोनमध्ये 2GB ची रॅम दिली आहे आणि ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ज्याला आपण १२८जीबी पर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध