2GB रॅमने सुसज्ज असलेला ओप्पो A33 स्मार्टफोन लाँच

2GB रॅमने सुसज्ज असलेला ओप्पो A33 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर, स्नॅपड्रॅगन 410 चिपसेट आणि 2GB/3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन A33 ला आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले आहे. ह्यावर्षी सप्टेंबरमध्ये असे सांगण्यात आले होते की, ही स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोच्या नवीन स्मार्टफोन A33 वर काम करत आहे.

 

सध्यातरी ओप्पो A33 ला चीनमध्ये प्रदर्शित केले गेले आहे आणि ही कंपनी चीनी वेबसाइटवर उपलब्ध आहे. चीनमध्ये ह्या स्मार्टफोनची किंमत 235 डॉलर(जवळपास १५,६०० रुपये) ठेवण्यात आली आहे.

ओप्पो A33 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाडकोर प्रोसेसर, स्नॅपड्रॅगन ४१० चिपसेट आणि 2GB/3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 2400mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

4G LTE तंत्रज्ञानाने सुसज्ज ओप्पो A33 मध्ये इतर कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ब्लूटुथ, वायफाय, GPS आणि मायक्रो-USB दिली गेली आहे. हा ड्युल मेटल फ्रेमने बनला आहे. ह्या फोनचे वजन १४६ ग्रॅम आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo