मजबूत बॉडीसह OPPO A3 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स 

मजबूत बॉडीसह OPPO A3 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स 
HIGHLIGHTS

Oppo ने A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo A3 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला.

Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro डॅमेज प्रूफ आर्मर बॉडीसह येतो.

Oppo A3 Pro 5G स्मार्टफोन कंपनीने 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला आहे.

OPPO A3 Pro 5G: स्मार्टफोन कंपनी Oppo ने A-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo A3 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. विशेष म्हणजे या फोनची बॉडी SGS Military स्टँडर्ड प्रमाणित आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तर, फोनची बॉडी खूप मजबूत आहे, तो पडला तरी फुटण्याची आणि खराब होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 20 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला आहे. तसेच, या फोनमध्ये अनेक पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. जाणून घेऊयात OPPO A3 Pro 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: 108MP कॅमेरासह Infinix Note 40 5G फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

OPPO A3 Pro 5G ची भारतात किंमत

OPPO A3 Pro भारतीय बाजारात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 8GB + 128GB स्टोरेज आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा हँडसेट अधिकृत वेबसाइट, स्टोअर्स, Amazon India, Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

OPPO A3 Pro 5G launched in india

OPPO A3 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विशेषतेबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo चा नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro डॅमेज प्रूफ आर्मर बॉडीसह येतो. या हँडसेटला SGS ड्रॉप प्रतिरोधक आणि SGS मिलिटरी स्टँडर्ड प्रमाणपत्र मिळाले आहे. फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे आणि टच सॅम्पलिंग दर 180Hz आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन्ससाठी यात ब्लू ग्लास टेम्पर्ड ग्लास बसवण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुरक्षा फीचर आहे.

या फोनबद्दल IP54 रेटिंग मिळाले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या मोबाईल फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि Mali GPU आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स आहे. हँडसेटच्या पुढील भागात 8MP कॅमेरा उपलब्ध आहे, ज्यासह LED फ्लॅश लाईट देखील आहे.

याव्यतिरिक्त, पॉवरसाठी फोनमध्ये 5,100mAh मजबूत बॅटरीने सुसज्ज आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. याशिवाय, हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे, जे SD कार्ड टाकून 2TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट प्रदान केले गेले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo