Oppo वेळोवेळी आपले नव नवीन डिवाइस लॉन्च करत असतो, आता एक नवीन लीक मध्ये असे समोर येत आहे की कंपनी आपल्या नवीन डिवाइस वर काम करत आहे, जो पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Oppo A3 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. इंटरनेट वर या स्मार्टफोन च्या बाबतीत एक मोठा खुलासा झाला आहे, ज्यात याची किंमत सह स्पेक्स आणि फीचर इत्यादि सोबत याची लॉन्च डेट पण समोर आली आहे.
जर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस मिड-रेंज श्रेणी मध्ये सादर करण्यात येईल. याव्यतिरिक्त यात एक 6.2-इंचाचा 2280×1080 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. असे पण समोर येत आहे की डिवाइस मध्ये 4GB रॅम तसेच 128GB ची इंटरनल स्टोरेज असणार आहे.
फोन मध्ये एक मीडियाटेक MTK6771 चिपसेट असू शकतो, जो 2.0GHz च्या क्लॉक स्पीड सह यात येईल. ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगत आहे की हा हेलिओ P60 आहे. त्याचबरोबर या डिवाइस मध्ये 16-मेगापिक्सल च्या रियर कॅमेरा बरोबर एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे.
फोन मध्ये एक 3,300mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे सोबत यात तुम्हाला एंड्राइड 8.1 Oreo मिळणार आहे. हा डिवाइस 1 मे ला 1,999 युआन म्हणजे जवळपास 318 डॉलर मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
आता काही दिवसांपूर्वी असे पण समोर आले आहे की कंपनी म्हणजेच Oppo आपल्या Oppo F7 Black Diamond ला 21 एप्रिलला भारतात सेल साठी आणणार आहे. तसेच हा फ्लिपकार्ट, अमेजॉन इंडिया आणि Paytm च्या माध्यमातून सेल केला जाईल. जसे की इतर सर्व F7 मॉडेल आहेत, या डिवाइस मध्ये पण तसेच स्पेक्स आणि फीचर असणार आहेत. पण हा डिजाईन च्या बाबतीत वेगळा आहे. तसेच स्टोरेज बद्दल पण असे बोलले जात आहे की हा जास्त स्टोरेज सह उपलब्ध होईल.