Oppo A3 स्मार्टफोन iPhone X सारख्या नाच डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे, या डिवाइस मध्ये एक टॉल डिस्प्ले पण आहे.
Oppo ने शेवटी आपला मिड-रेंज स्मार्टफोन Oppo A3 चीन मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोन च्या मुख्य फीचर्स मध्ये याचा टॉल डिस्प्ले, जो नॉच सह येईल. तसेच हा एंड्राइड Oreo सह लॉन्च केला गेला आहे. या डिवाइस ची किंमत CNY 2,099 म्हणजे जवळपास Rs 22,000 आहे, हा डिवाइस तुम्ही काही कलर ऑप्शन मध्ये घेऊ शकता. हा कंपनी ने ब्लॅक, सिल्वर, पिंक, आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला आहे. असे पण समोर येत आहे की हा भारतात कधीपण लॉन्च केला जाऊ शकतो. या डिवाइस ची मुख्य खासियत याचा रियर पॅनल म्हणू शकतो. पण याच्या रियर पॅनल वर तुम्हाला ड्यूल कॅमेरा दिसत नाही. पण हा बेजल-लेस फोन्स मध्ये हा एक ट्रेंड बनत आहे. फोन मध्ये ग्लास फिनिश सह एक नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे त्यामुळे हा कमी किंमतीत पण प्रीमियम फील देतो. Oppo A3 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स या डिवाइस मध्ये एक 6.2-इंचाचा LCD पॅनल देण्यात आला आहे, त्याचबरोबर यात एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये मीडियाटेक P60 ओक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2GHz आहे, फोन मध्ये तुम्हाला एक 4GB च्या रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच यूजर एक्सपीरियंस वाढवण्यासाठी फोन मध्ये AI क्षमता देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्ड ने तुम्ही याची स्टोरेज वाढवू शकता. फोन मधील कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा रियर कैमरा f/1.8अपर्चर सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर याच्या फ्रंटला एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा f/2.2 अपर्चर सह दिला गेला आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 3,400mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे. हा डिवाइस एंड्राइड Oreo सह कलर OS 5.0 वर चालतो.