Oppo A18 चा नवीन स्टोरेज व्हेरिएंट Affordable किमतीत लाँच, ‘या’ ऑफरसह आणखी स्वस्त होणार फोन। Tech News
Oppo A18 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच
नवीन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये
निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध
Oppo A18 भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्मार्टफोनपैकी एक आहे. सुरुवातीला या फोनचा फक्त 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंट लाँच करण्यात आला होता. आता हा फोन अखेर नवीन 128GB व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नवीन व्हेरिएंटचे भारतीय लाँच या उपकरणाच्या UAE लाँचनंतर आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Oppo A18 च्या नव्या व्हेरिएंटची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: WhatsApp Tips: आता सहज शोधता येतील अगदी जुने मॅसेज, लवकरच येणार Exciting फिचर। Tech News
Oppo A18 च्या नव्या व्हेरिएंटची किंमत
Oppo A18 च्या नवीन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. हा व्हेरिएंट केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. 64GB स्टोरेज असलेल्या या हँडसेटच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे.
बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे. याशिवाय, येथे नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे.
Oppo A18 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo चा नवीन A18 स्मार्टफोन 6.56-इंच लांबीच्या LCD डिस्प्लेसह येतो, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि HD+ रिझोल्यूशन मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो आता 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेला आहे. हा हँडसेट Android 13 वर आधारित Color OS 13.1 वर चालतो.
ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 8GB प्रायमरी शूटरसह 2MP डेप्थ सेन्सर ऑफर करतो. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देखील मिळणार आहे. इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी या डिव्हाइसमध्ये मायक्रो SD कार्ड स्लॉट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि USB टाइप-C पोर्ट आहे. याला IP54 प्रमाणपत्र, 5G सपोर्ट, ड्युअल-बँड Wi Fi, ब्लूटूथ 5.3 आणि GNSS देखील देण्यात आले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile