Oppo A18 कंपनीचा नवीन Affordable स्मार्टफोन भारतात लाँच, फोनच्या खरेदीसह विशेष विजेत्यांना Enco Buds 2 मोफत | Tech News

Updated on 05-Oct-2023
HIGHLIGHTS

A-सिरीजचा Oppo A18 बजेट विभागातील मोबाईल भारतीय बाजारात लाँच

तुम्हाला हा फोन 10 हजार रुपयांअंतर्गत खरेदी करता येईल.

कंपनी डिव्हाइसवर SBI, वन कार्ड, IDFC, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकवर 1000 रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे.

Oppo ने आपल्या A-सिरीजचा Oppo A18 बजेट विभागातील मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधी हा डिवाइस UAE मध्ये सादर करण्यात आला होता. भारतातही याचे स्पेसिफिकेशन्स UAE मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Oppo A18 स्मार्टफोन लाँचबाबत माहिती दिली आहे आणि आपल्या वेबसाइटवर देखील सूचीबद्ध केली आहे. तुम्हाला हा फोन 10 घर रुपयांअंतर्गत खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घ्या नव्या Oppo A18 फोनची नेमकी किंमत आणि इतर तपशील.

हे सुद्धा वाचा: Amazon Kickstarter Deals: आगामी सेलमध्ये Realme फोनवर मिळेल प्रचंड Discount, बेस्ट डिल्स जाहीर। Tech News

Oppo A18 ची किंमत आणि उपलब्धता

Oppo चा नवीन Oppo A18 मोबाईल सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. डिव्हाइसच्या 4GB RAM + 64GB स्टोरेजची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. हे उपकरण ग्लोइंग ब्लू आणि ग्लोइंग ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.

एवढेच नाही तर, कंपनी डिव्हाइसवर SBI, वन कार्ड, IDFC, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकवर 1000 रुपयांची कॅशबॅक ऑफर देत आहे. एवढेच नाही तर लकी ड्रॉ ऑफर अंतर्गत, ब्रँड Oppo A18 खरेदी केल्यावर विशेष विजेत्यांना Oppo Enco Buds 2 मोफत देखील देईल.

Oppo A18 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा HD + LCD डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 90Hz टच सॅम्पलिंग रेट उपलब्ध आहे. Oppo A18 फोनमध्ये, उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी तुम्हाला MediaTek Helio G85 चिपसेट मिळेल. डिव्हाइसमध्ये 4GB RAM + 64GB इंटर्नल स्टोरेज आहे. त्याबरोरबच, 4GB विस्तारित रॅम सपोर्टच्या मदतीने एकूण 8GB पर्यंत रॅम तुम्हाला फोनमध्ये मिळेल.

oppo a18

याशिवाय, फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी काही मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकू शकते. फोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Oppo A18 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सेल इतर कॅमेरा लेन्स देण्यात आली आहेत.

एव्हढेच नाही तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा लेन्स आहे. या कॅमेर्‍याच्या लेन्सची विशेष गोष्ट म्हणजे यात नाईट, व्हिडिओ, फोटो पोर्ट्रेट, टाइमलॅप्स, प्रो, पॅनो, गुगल लेन्स यांसारख्या फीचर्सचे समर्थन आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :