Oppo ने आपला नवीन फोन Oppo A17k भारतीय बाजारात लाँच केला आहे. Oppo A17k हा Oppo च्या A सिरीजचा नवीन सदस्य आहे, जो दोन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. Oppo A17k मध्ये 60Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. Oppo A17k मध्ये Helio G35 प्रोसेसर आहे, जो ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देखील आहे.
हे सुद्धा वाचा : Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' आता OTT वर धमाल करण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे बघता येईल चित्रपट…
Oppo A17k मध्ये Android 12 सह ColorOS 12.1.1 आहे. Oppo A17k मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 3 GB RAM सह 64 GB स्टोरेज आणि MediaTek Helio G35 प्रोसेसरसह 4 GB व्हर्च्युअल रॅम आहे.
Oppo A17k मध्ये ऑटोफोकससह 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फ्रंटला 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A17k चे स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. Oppo A17k मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11a/b/g/n, Bluetooth v5.3, GPS/A-GPS, GLONASS, Beidou, Micro USB आणि 3.5mm ऑडिओ जॅक उपलब्ध असतील. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Oppo A17k मध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि फोनचे एकूण वजन 189 ग्रॅम आहे.
Oppo A17k ची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन त्याच वेरिएंट 3 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. Oppo A17k नेव्ही ब्लू आणि गोल्ड कलरमध्ये खरेदी करता येईल. फोन Coming Sun सह Oppo इंडिया साइटवर सूचीबद्ध झालेला आहे.