OPPO A1 चीन मध्ये झाला लॉन्च, फेस अनलॉक फीचर असेल यात
OPPO A1 स्मार्टफोन तीन कलर्स डार्क ब्लू, चेरी रेड आणि वाइट कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
OPPO ने आपला नवीन OPPO A1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस काही खास कलर्स आणि किफायती किंमतीत सादर करण्यात आला आहे. याआधी कंपनी ने OPPO R15 आणि R15 Dream Mirror Edition स्मार्टफोंस लॉन्च केले होते.
OPPO A1 स्मार्टफोन तीन कलर्स डार्क ब्लू, चेरी रेड आणि वाइट कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. ब्लू आणि रेड वेरिएन्ट्स ला मॅट फिनिश देण्यात आली आहे, तसेच वाइट कलर रेफ्लेक्टिव आहे आणि असा लुक देतो की जणू याला ग्लास मध्ये कवर केले असावे. डिस्प्ले ला 2.5D कर्व्ड देण्यात आला आहे आणि याच्या मागच्या बाजूस सिंगल कॅमेरा आणि एक LED फ्लॅश आहे.
या डिवाइस मध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे तसेच या डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. डिवाइस च्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि फ्रंट ला 8 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. या डिवाइस मध्ये 3180mAh ची बॅटरी आहे.
नवीन स्मार्टफोन फेस अनलॉक फीचर सह येतो पण कंपनी ने यात फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला नाही. हा डिवाइस काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च करण्यात आला होता याची किंमत ¥1399 (जवळपास Rs 14,400) आहे. हा डिवाइस चीन मध्ये 1 एप्रिल पासून सकाळी 10 वाजता सेल साठी उपलब्ध होईल. अशा आहे की कंपनी लवकरच आपला Oppo F7 स्मार्टफोन लॉन्च करेल जो फुल स्क्रीन डिजाइन सह येईल आणि याच्या टॉप वर iPhone X सारखा notch असेल.
या डिवाइस मध्ये 6.23 इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले असेल आणि मीडियाटेक हेलिओ P60 ओक्टा-कोर SoC तसेच माली-G72MP3 GPU वर चालेल. याव्यतिरिक्त या डिवाइस मध्ये 6GB रॅम असू शकतो. Oppo F7 मध्ये 16 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि 25 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल. हा डिवाइस 3,400mAh च्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो.