OPPO K12x 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! पहा आगामी फोनची पहिली झलक, फीचर्सदेखील उघड
OPPO K12x 5G स्मार्टफोनची भारतात जुलैच्या शेवटी होणार लाँच
भारतापूर्वी OPPO K12x 5G फोन चिनी मार्केटमध्ये दाखल झाला आहे.
OPPO K12x 5G फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह
OPPO K12x 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO K12x 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या K सीरीजची ही नवीनतम आवृत्ती असणार आहे. लक्षात घ्या की, भारतापूर्वी OPPO K12x 5G फोन चिनी मार्केटमध्ये आला आहे. Oppo ने आपल्या अधिकृत साइटवर या फोनचे लाँच टीज केले आहे. तसेच, हा फोन लाँच तारखेसह ई-कॉमर्स साईट Flipkart वर देखील सूचीबद्ध करण्यात आला आहे.
OPPO K12x 5G चे भारतीय लाँच
वर सांगितल्याप्रमाणे, OPPO ने त्यांच्या अधिकृत साइटवर OPPO K12x 5G फोनला टीज करण्यास सुरुवात केली आहे. हा फोन 29 जुलै रोजी भारतात दाखल होईल. फोनच्या कलर ऑप्शन्स आणि मुख्य फीचर्सशी संबंधित तपशीलही या साइटद्वारे समोर आला आहे.
Style redefined, get ready to #LiveUnstoppable with the all-new #OPPOK12x5G launching on July 29th!
— OPPO India (@OPPOIndia) July 22, 2024
Stay tuned for the deadly combo of next-level design and durability ✨
Know more: https://t.co/8jQuyeDluM pic.twitter.com/VAF4UR6Ors
एवढेच नाही तर, फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. या लिस्टिंगद्वारे फोनच्या लाँचची तारीख निश्चित झाली आहे. हा फोन Breeze Blue आणि Midnight Violet या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, फ्लॅश लाईट रिंग मॉड्यूलमध्ये स्थित असेल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पंच-होल कटआउट देखील असेल.
OPPO K12x 5G
वर सांगितल्याप्रमाणे, OPPO K12x 5G फोन आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचे फिचर OnePlus Nord CE 4 Lite 5G सारखी असतील, असा अंदाज आहे. त्यानुसार, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. तर, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. या फोनमध्ये 50MP प्रायमरी आणि 2MP सेकंडरी कॅमेरा असेल. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile